रत्नागिरी येथील राजापूरच्या उन्हाळे गावातून राजापूरची गंगा वाहते. उन्हाळे गावामधूनच गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.
#lokmatbhakti #rajapur #gangasnan #konkan #ratnagiri
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा